Ad will apear here
Next
विदुरनीती - भाग ५


प्रवृत्तवाक्चित्रकथ ऊहवान् प्रतिभानवान् ।
आशु ग्रन्थस्य वक्ता च यस्स पण्डित उच्यते ।। वि. १.३३।।

अर्थ : ज्याची वाणी प्रवाही आहे, जो विविध प्रकारे संवाद साधतो, जो अर्थ सांगण्यामध्ये निपुण व प्रतिभाशाली आहे तसेच जो कोणत्याही ग्रंथाचे सार ताबडतोब सांगतो, त्याला पंडित म्हटले जाते. 

श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा ।
असम्भिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः ।।वि. १.३४।।

अर्थ : ज्याची विद्या बुद्धीचे अनुसरण करणारी असते आणि बुद्धी विद्येचे अनुसरण करणारी असते, तसेच जो सज्जनांच्या मर्यादांचे उल्लंघन करीत नाही, त्या मनुष्याला पंडित म्हणून प्रसिद्धी मिळते.

पंडितांची लक्षणे सांगून झाल्यावर विदुर पंडित लोक मूर्ख कोणाला म्हणतात याबद्दल सांगतात.

अश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः। 
अर्थांश्चाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ।।वि. १.३५।।

अर्थ : जो कोणताही शास्त्राभ्यास न करता अहंकारी असतो, दरिद्री असूनही मोठ्या इच्छा मनात आणतो आणि जो काम न करताही धन मिळविण्याची इच्छा करतो, त्याला पंडित लोक मूर्ख म्हणतात.

स्वमर्थं यः परित्यज्य परार्थमनुतिष्ठति । 
मिथ्याचरति मित्रार्थे यश्च मूढः स उच्यते ।।वि. १.३६।।

अर्थ : जो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या व्यक्तींच्या कर्तव्यांचे पालन करतो. तसेच जो मित्रांबरोबर खोटे वागतो, त्याला मूर्ख म्हटले जाते.

- कु. तनुजा फाटक
(एमए - द्वितीय वर्ष)
संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

(सौजन्य : रत्नागिरी न्यूज नेटवर्क)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MUIECW
Similar Posts
विदुरनीती - भाग ६ अकामान् कामयति यः कामयानान् परित्यजेत् । बलवन्तं च यो द्वेष्टि तमाहुर्मूढचेतसम् ।। वि. १.३७।।
विदुरनीती - भाग ४ नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् । आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ।।वि. १.२८।।
विदुरनीती - भाग ३ क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता । यमर्थान्नापकर्षन्ति स वै पण्डित उच्यते ।। वि. १.२२ ।।
विदुरनीती - भाग १ व्यासरचित महाभारतातील पाचव्या पर्वाचे नाव उद्योगपर्व. या पर्वातील एक उपपर्व म्हणजे प्रजागरपर्व. या प्रजागरपर्वाचाच एक भाग विदुरनीती या नावाने प्रसिद्ध आहे. महाभारत युद्धापूर्वी विदुराने धृतराष्ट्राला राजधर्माचा उपदेश केला. हाच उपदेश नंतरच्या काळात ‘विदुरनीती’ या नावाने प्रसिद्ध झाला. राजधर्माचे सुंदर निरूपण यामध्ये केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language